March 26, 2026

वाळूजमहानगर (ता.5) :- रांजणगाव (शेणपुंजी) येथे वंचित बहुजन आघाडी पक्षासाठी शहर कमिटी व सर्कल कमिटी निर्माण करावयाची आहे. यासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याने नारायण कानडे यांच्या मंगल कार्यलयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार राज्याच्या अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या अधिपत्याखाली आणि वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबाद जिल्हा प्रभारी अध्यक्षा अरुंधतीताई शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष योगेश बन, जिल्हा महासचिव संघराज धम्मकिर्ती, जिल्हा सहसचिव अशोकराव खिल्लारे, वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद जिल्हा माजी सचिव डॉ. प्रा. समाधान वाघमारे व वंचित बहुजन आघाडीचे गंगापूर तालुका कार्यकारणी सदस्य अमृतराव डोंगरदिवे आणि अर्जून अभग व सर्कल अध्यक्ष अमोल भालेराव यांच्या उपस्थितीत रांजणगाव (शेणपुंजी) सर्कल व शहर पदाधिकाऱ्यांची बैठकीचे आयोजन शुक्रवारी (ता.7) रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आले आहे या बैठकीस जास्तीत जास्त संख्येनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. असे अवाहन संयोजकांनी केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *