March 24, 2026


वाळूजमहानगर ता.5) – भगवान महावीर यांच्या 2622 व्या जयंती निमित्त “जिओ और जिने दो” चा संदेश देत बजाजनगर येथे सकल जैन समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक, मोटरसायकल रॅली, झेंडावंदन, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, भंडारा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन मंगळवारी (ता.4) रोजी भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी संपूर्ण जैन समाजाची रॅली सकल जैन समाजाचे अध्यक्ष अनिल भैया चोरडिया यांचे नेतृत्वात काढण्यात आली. रॅलीमध्ये भगवान महावीर स्वामींच्या जीवनावर आधारित सचिव निर्जीव देखावे सादर करण्यात आले होते. रॅलीमध्ये श्रीवर्धमान श्वेतांबर स्थानकवाशी
जैन श्रावक संघ, खंडेलवाल दिगंबर पंचायत, शेतवाल दिगंबर पंचायत सहभागी झाले होते. भव्य रॅली जैन स्थानक बजाजनगर येथे पोहोचल्यानंतर झेंडावंदन करण्यात आले.
त्यानंतर पाठशाळेच्या मुलांचे महावीर स्वामींच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यात श्रुत कन्या मंडळ, आनंद भक्ती बहु मंडळ, जैन सोशल बहु मंडळ, नवकार महिला मंडळ, त्रिशाला महिला मंडळ, मुलांचे स्तवन आदी कार्यक्रम झाले.

भगवान महावीर जयंती निमित्त टू व्हीलर रॅली महावीर चौक, पंढरपूर ते महावीर चौक छत्रपती संभाजीनगर व महावीर चौक ते रांजणगाव अशी काढण्यात आली. श्री वर्धमान शेतांबर स्थानक वाशी जैन श्रावक संघ व अमृता ब्लड बँक यांचे संयुक्त विद्यमाने भगवान महावीर स्वामी जन्म कल्याण निमित्त जैन स्थानक पंढरपूर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शेवटी श्रावक संघातर्फे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रावक संघाचे अध्यक्ष संतोष चोरडिया, उपाध्यक्ष किशोर राका, सचिव चंद्रकांत चोरडिया, महावीर जन्म कल्याण समितीचे अध्यक्ष मनोज मंडलेचा, संजय संचेती, मनोज कटारिया, अशोक बेदमुथा, श्याम पंडित, अजय दुगड, प्रवीण बोरा, सागर चोरडिया, किरण नहार, चेतन छाजेड, स्वरूपचंद भळगटीया, रोहित सिंगी, अमित चोरडिया, रवींद्र बेदमुथा, खंडेलवाल दिगंबर पंचायतचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र काला, सचिव सुजित गोधा, मनोज कासलीवाल, कुशल पाटणी, जीवन गंगवाल, शेतवाल दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष कुमार नवले सचिव पवन पाटील, राजेंद्र आतारे, दिलीप ढेरे यांनी रॅली प्रयत्न केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *