
वाळुज महानगर (ता.2) : दुचाकी वर जाणाऱ्या एका तरुणास अज्ञात कारने जोराची धडक दिल्याने तो जखमी झाला. हा अपघात छत्रपती संभाजीनगर ते नगर हायवे वर लिंबेजळगाव फाट्यावर शनिवारी (ता.1) रोजी 8.45 वाजेच्या सुमारास झाला. या घटनेची माहिती मिळताच जवळच 24 तास सेवेत असणारी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांची ॲम्बुलन्स हजर होऊन अपघातग्रस्ताला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यावरून जाफराबादला निघालेला मोटरसायकल स्वार (एम एच -28, ए टी – 9096) तुषार गजानन राऊत रा.जालना, (वय 26) जात होता. तो लिंबे जळगाव फाट्यावर येतात त्याला अवेंजर गाडीने कट मारून पसार झाला. शनिवारी (ता.1) रोजी रात्री आठ पंचेचाळीस वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात तुषार राऊत जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच जवळच लिंबे जळगाव पॉईंट वर असणारी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची ॲम्बुलन्सने अपघात ग्रस्ताला जिल्हा रुग्णालय दाखल केले.
