
वाळूजमहानगर (ता.31) – बजाजनगर येथील अयोध्यानगरितील प्रभू श्री रामचंद् मंदिराच्या प्रांगणात टाळ -मृदूंगाच्या गजरात श्रीराम नवमी महोत्सव गुरुवारी (ता.30) रोजी विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गायत्री आश्रम वाघोळा येथील ह भ प महंत विशुद्धानंद महाराज यांनी काल्याचे कीर्तनात मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामाच्या चरित्राचे आचरण व श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या चारित्राचे उच्चारण करण्याबाबत मार्गदर्शन केले.
मंदिर परिसरात रक्तदान शिबीर व सर्वरोग निदान शिबीरही आयोजित केले होते. यावेळी घाटी रक्त संकलन केंद्राच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. या शिबिरात 35 जणांनी रक्तदान तर चारशे जणांनी आरोग्य तपासण्या केली.
सियावर राम चंद्र की जय च्या जय घोषात या जन्मोत्सवाला रामभक्तांनी प्रचंड गर्दी केली हेाती. परीसरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
रेखा गजरे यांनी दीड किलो रांगोळी ने सलग चार तास वेळ खर्च करून श्रीरामाची रांगोळी काढली. तसेच रामजन्माचा देखावा तयार करण्यात आला हाेता. महिलांनी पाळण्यात बालक अवस्थेतील रामाची मूर्ती ठेवून पाळणा गीते म्हटली. त्यानंतर महाआरती करण्यात आली आणि भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री राम मंदिर कमिटीचे अध्यक्ष गोंविद जवणे, सचिव अवचितराव मोरे, उपाध्यक्ष रामनाथ उढाण, आनंद देवर, विजय खेंगरे, श्रीधर मुळीक, प्रसाद ठोंबरे, हभप कैलास महाराज बारगळ, भाऊसाहेब शिनगारे, समिर तोरे, सोपान काळे, संजय साबळे, संजय गांडोळे, दिगंबर गायके, दत्तू गायकवाड, पोपटराव मस्के, संजय बगडाणे, प्रमोद जाधव, विष्णू संकपाळ, जय श्रीराम सेवाभावी संस्था व श्रीराम मित्र मंडळ अयोध्यानगर यांच्यासह अशोक जंगमे, सतिष ठुले, जयदिप म्हस्के, नचिकेत कदम, आकाश पालवे, हर्षदा शिरसाट, हनुमान भोंडवे, सरपंच सुनील काळे, नारायण कुंटे, श्रीराम महिला व पुरुष भजनी मंडळ यांच्यासह अयोध्यानगरातील महिला व पुरुष भक्त उपस्थित होते.
