
वाळूजमहानगर (ता.30) – वाळुज येथील दिव्यांग कन्या वंदना सैतवालने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत तलवारबाजी स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रासाठी ब्रॉंझ मेडल पटकावले. या कामगारीबद्ल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वी तिने अथलँटिक्स व तलवारबाजी स्पर्धेत 11 पदकं मिळवून दिलेले आहेत.
15 व्या राष्ट्रीय व्हील चेअर तलवारबाजी स्पर्धेत वंदना सैतवालने ब्रॉंझ मेडल पटकावत राष्ट्रीय पातळीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नाव कोरले आहे. ही स्पर्धा शुक्रवारी (ता.24) मार्च ते मंगळवारी (ता.28) मार्च 2023 दरम्यान करणाल हरियाणा येथे घेण्यात आली. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्यातील वाळुज गावातील दिव्यांग कन्येने प्रतिनिधित्व केले. व ब्रॉंझ मेडल घेत जिल्हा व महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर कोरले. वंदना सैतवाल स्वतः दिव्यांग असुन तिचा डावा पाय पोलिओग्रस्त असताना तिनेही कामगिरी केली.
तिने आपल्या जिल्हयाला यापूर्वी अथेलँटीक्स व तलवारबाजी स्पर्धेत 11 पदके मिळून दिले. आत्ता 1 ब्रॉंझ मेडल असे 12 मेडल तिने मिळवले आहेत. तिने यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावर छत्रपती संभाजीनगर जिल्हयाचे नाव लौकिक केले आहे. यापुढे देशासाठी मेडल मिळवण्याचे तिचे स्वप्न आहे. या ब्रांझ पदकाचे श्रेय ती तीचे प्रशिक्षक गुरू विनय साबळे, महेंद्र हेमने,पॅरा ऑलम्पिक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष नंदकिशोर नाले तसेच तिला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्याना देते.
