March 20, 2026

              वाळूजमहानगर (ता.24) – छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर झालेल्या अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळावा, म्हणून तत्पर असलेल्या गणेश राऊत हा शिवसैनिक नुकत्याच झालेल्या एका अपघातात जखमी झाल्याने त्याची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भेट घेऊन आस्थेवाईकपणे विचार केली.


छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर विशेषतः लिंबे जळगाव ते इसारवाडी फाटा दरम्यान नेहमी अपघात होतात. या अपघातात अनेक जण जखमी झालेले आहेत. अजूनही अपघाताची मालिका सुरूच आहे. रात्री बेरात्री झालेल्या या अपघातातील जखमींना वेळेवर उपचारार्थ दाखल करण्याचे काम दहेगाव बंगला येथील शिवसेना जिल्हा संघटक गणेश राऊत हे करत असत. मात्र नुकत्याच झालेल्या एका अपघातात गणेश राऊत हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते.

कट्टर शिवसैनिक व शिवसेनेचे जिल्हासंघटकपद असलेल्या गणेश राऊत जखमी असल्याची माहिती मिळताच विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गणेश राऊत यांच्या दहेगाव बंगला येथील घरी जाऊन भेट घेतली. व आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी शिंदे, उपतालुका प्रमुख लक्ष्मण सुपेकर, सरपंच जालंदर राऊत, गट प्रमुख उत्तम म्हस्के, प्रकाश घुनावत, पप्पु खरात, संतोष धोंडे आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *