March 24, 2026

वाळूजमहानगर (ता.24) – पैशाच्या वादातुन शिवीगाळ करुन हाताचापाटाने व लोखंडी रॉड डोक्यात घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेल्या त्या गंभीर जखमी तरुणाचा अखेर उपचारादरम्यान घाटीत गुरुवारी (ता.23) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. बजाजनगर येथे शनिवारी (ता.18) रोजी संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विकी चव्हाण याचे विठ्ठल रुक्मिनी मंदिराजवळील देवगिरी बँक समोर चव्हाण गॅरेज आहे. सुनील फलके रा. ज्ञानदिप विद्यालयाच्या पाठीमागे वडगाव (कोल्हाटी) गट नं- 41, साजापुर वाळूज एमआयडीसी (मुळ रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर. हा चव्हाण गॅरेजवर गेला असताना चव्हाण गॅरेज याचे सन्मीत्र ट्रान्सपोर्टकडे गॅरेजचे पैसे बाकी आहे. असे गॅरेज चालक विकी चव्हाण म्हणाला, तेव्हा त्याने विकी चव्हाण यास सांगितले की, तुम्ही ट्रान्सपोर्ट वाल्याकडे तुमचे पैसे मागा, ट्रान्सपोर्ट वाल्याने गाडीच्या कामासाठी गाडी पाठविली आहे, तुम्ही गाडीचे काम करुन द्या. असे म्हणाल्यावरुन

विकी चव्हाण याने सुनीलला शिवीगाळ करुन हाताचापटाने मारहाण व लोखंडी रॉड डोक्यात मारुन गंभीर जखमी करुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (ता.18) रोजी संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात सुनील फलके हा गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान सुनील फलके याचा गुरुवारी (ता.23) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घाटीत मृत्यू झाला. या घटनेची नोंद वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आली आहे. गॅरेज चालकाच्या मारहाणीने वाहन चालकाचा मृत्यू झाल्याच्या या घटनेनंतर वाळूज औद्योगिक वसाहतीतील नागरिकांसह ट्रान्सपोर्ट, गॅरेज व वाहनचालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *