
वाळूजमहानगर (ता.20) – अंबेलोहळ येथील ग्राम पंचायतच्या 15 व्या वित्त आयोगा मधून वॉर्ड क्रमांक 2 मधे मंजूर झालेले ड्रेनेज पाईपलाइनचे उद्धघाटन मनसे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर पाटिल व गावातील जेस्ट नागरिक अब्बास बाबा यांच्या हस्ते सोमवारी (ता.20) रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य हाजी सुल्तानबी, फकीर मोहम्मद, जियाखान, अफसर पटेल, रफीक पटेल, हुसैन सय्यद, बिलाल बाबा, अब्दुल मामू, मशीद मामू, अय्यूब मामू, युनुस शेख, नवनात बरबडे, अशोक बनकर, अमोल बरबडे, बशीर शेख, अल्ताफ पटेल, सय्यद सिराज, सागर जगधने, शपिक पटेल, मुकतार पटेल, निसार शेख, नाजिम कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अहमद गुलाब शेख यानी आलेल्या पाहुण्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी वसीम कुरेशी यांनी सीमेंट रस्त्याची मागणी केली असता दिलीप नाना बनकर यानी दिवाली पर्यन्त करुन देतो. असे आश्वासन दिले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी नाना इंगले, देवीदास प्रधान, विष्णु गाडेकर, सचिन दाभाडे हजर होते.
