March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.16) – सध्या शहराच्या नामकरणावरून राजकारण सुरू आहे, विधानसभा, लोकसभेत प्रश्न सोडवण्याऐवजी राजकारण करणाऱ्या व सरकारी मानधन घेऊन सरकारी निर्णायाच्या विरोधात रस्त्यावर उतरुन जनतेला वेठीस धरणार्या आमदार, खासदारांचे मानधन तात्काळ थांबवा. अशी मागणी उद्योग क्रांती उद्योजक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या या निवेदनात असे नमूद आहे की, सरकारी मानधन घेऊन सरकारी निर्णायाच्या विरोधात रस्त्यावर उतरुन जनतेला वेठिस धरणारे जे लोकप्रतीनिधी असतील त्यांचे मानधन बंद करण्यात यावे. जनतेचे प्रश्न चर्चेतुन सोडवण्यासाठी जनतेने त्यांना निवडुन दिले. परंतु लोकसभेत, विधानसभेत चर्चा करुन प्रश्न सोडवायचे सोडुन रस्त्यावर उतरल्याने त्यांनी घेतलेली शपथ ही खोटी ठरते. त्यांनी चर्चेतुन वा न्यायीक मार्गाने प्रश्न सोडवावे, जनतेला वेठिस धरुन जनतेचे नुकसान करु नये. असे जनतेचे नुकसान करणार्या व पक्षपात करणाऱ्या जाती धर्माच्या आधारावर राजकारण करणार्या लोकप्रतिनिधीचे मानधन व सरकारी सोई, सुविधा तत्काळ बंद कराव्यात. या गंभीर बाबीचा गांभीर्याने विचार करुन तत्काळ निर्णय घ्यावा. नसता ना इलाजाने आम्हालाही उद्योग सोडुन रिकामा उद्योग करावा लागेल व शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता आंदोलन करावे लागेल. याची नोंद घ्यावी. उद्योग क्रांती उद्योजक संघाचे अध्यक्ष सुरेश फुलारे यांनी हे निवेदन दिले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *