
वाळूजमहानगर, (ता.1) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील के सेक्टर मध्ये असलेल्या एका कंपनीच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी आतील 70 हजार रुपये किमतीचे स्पेअर पार्ट लंपास केले. ही चोरीची घटना बुधवारी (ता.22) रोजी सकाळी ओळखीस आली.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील के सेक्टरमधील प्लॉट क्रमांक 3 येथे शितल वाल्मीकराव ढाले वय 41 वर्ष रा. ज्योतीनगर, औरंगाबाद यांच्या भावाची कंपनी मयंक इंडस्ट्रीज ऑटो नावाची कंपनी आहे. ही कंपनी त्या चालवतात. बुधवारी (ता.22) रोजी त्या नेहमी प्रमाणे कंपनीत आल्या असता सुपरवायझर रामेश्वर आधाने यांनी कळविले की, कंपनीत चोरी झाली आहे. त्यावरुन शितल ढाले यांनी स्टाफसह कंपनीत जावुन पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या मागील बाजुस असलेले खिडकीचे गज कापून डाईज 17 नग, रॉ मटेरीयल 400 किलो, हॅन्ड ग्राइंडर-1, न्युमेटीक गण 2, एलईडी टिव्ही असे एकुण 70 हजार रुपये किंमतीचा ऑटो मोबाईल पार्ट चोरून नेले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
