वाळूजमहानगर, (ता.1) – साडीला पिको करून येते, असे म्हणून घरातून निघून गेलेली 21 वर्षीय तरुणी मंगळवारी (ता.28) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भारतनगर वाळूज येथून बेपत्ता झाली.
शोभा राजेंद्र शिरसाट वय 21 असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. आई दवाखान्यात कामाला गेल्यानंतर शोभा शिरसाट ही व तिची भावजई या घरीच होत्या. दुपारी 4 वाजेच्या सुमारास शोभा ही भाऊजईला म्हणाली की, मी साडीला पिको करून आणते. असे म्हणून ती मंगळवारी (ता.28) रोजी घरातून निघून गेली. मात्र ती घरी परतली नाही. त्यामुळे तिचा टेलरच्या दुकानात नातेवाईकांकडे व परिसरात शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.

वय 21 वर्षे, रंग सावळा, केस काळे, शरिर बांधा सडपातळ, उंची 5 फुट, अंगात चॉकलेटी रंगाचा लॉग ड्रेस, पायात कलरची जुती, बोली भाषा मराठी-हिंदी बोलते. सोबत सॅमसंग (निळे रंगाचे कव्हर) मोबाइल असे तिचे वर्णन आहे.
याप्रकरणी शोभाची आई वैशाली राजेंद्र शिरसाट यांच्या खबरीवरून वाळूज पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले करीत आहे.
