March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.25) – सुमारे तीस वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सिडकोच्या एलआयसी व एमआयजी ग्रह प्रकल्पा अंतर्गत नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्यात. या मागणीसाठी मंगळवारी (ता.21) फेब्रुवारीपासून सुरू केले उपोषण अखेर सिडकोच्या लेखी आश्वासनानंतर शुक्रवारी (ता.24) रोजी म्हणजेच तब्बल चार दिवसानंतर मागे घेण्यात आले.

                मूलभूत सोयी सुविधांची मागणी,

                वर्पे यांचे सलग चार दिवस उपोषण,

                नागरिकांचा मोठा पाठिंबा,

                घंटा नाद करून जागवले प्रशासनाला

वाळूज महानगर -1 अंतर्गत अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट गृहनिर्माण योजनेतील नागरिकांना मूलभूत सुविधा द्याव्यात. या मागणी साठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे विभागप्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी मंगळवारी (ता.21) रोजी पासून सिडको कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. चार दिवस सुरू असलेले या उपोषणामुळे दत्तात्रय वर्पे यांची प्रकृती खालावत होती. मात्र सिडको प्रशासन दखल घेईन. त्यामुळे परिसरातील महिलांनी थाळी नाद करून सिडको प्रशासनाला जागी करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर सिडको प्रशासनाकडून दत्तात्रय वर्पे यांना लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने दत्तात्रय वर्पे यांचे अमरण उपोषण शुक्रवारी (ता.24) रोजी सोडवण्यात आले. यावेळी सिडकोचे कार्यकारी अभियंता कपिल राजपुत यांच्या हस्ते उपोषणकर्ते दत्तात्रय वर्पे यांना लिंबुसरबत दिले.

यावेळी यांची होती उपस्थिती…..

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *