
वाळूजमहानगर, (ता.23) – वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात पोवाडे, महाराष्ट्र गीत गाणाऱ्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सुनील चिपाटे, हरिश्चंद्र रामटेके, सचिन वाघ, अनिता राठोड, मंगल गाडेकर, सोनाली निकम, दिपाली काळबांडे, सुवर्णा शिंदे, हेमलता जाधव, रिता मार्कंडे, विद्या सोनोने, योगिता देवकाते आदींची उपस्थिती होती.
