वाळूजमहानगर, (ता.22) – सामान्य कार्यकर्ता हॉटेल व्यवसायात उतरतो, आपल्या सर्वांसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे, आनंदाची बाब आहे. अशा हॉटेलची संभाजीनगर परिसरात गरज होती. ती आज पूर्ण झाली. असे शुभेच्छापर प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हॉटेल ग्रँड सरोवरच्या उद्घाटन प्रसंगी बुधवारी (ता.22) रोजी केले.
आमदार प्रदीप जैस्वाल यांनी वाळूज परिसरात हॉटेल ग्रँड सरोवरच्या माध्यमातून हॉटेल व्यवसायात पदार्पण केले. या हॉटेलचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमास आमदार रमेश बोरणारे, पालकमंत्री संदिपान भुमरे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील, नगरसेवक सिद्धांत शिरसाट आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आमच्या ठाण्यात कोणताही व्यवसाय सुरूवात झाला तर त्याचे उद्घाटनला मला बोलवतात. आणि तेथे मी आवर्जून जातो.
त्यामुळे यश मिळते. असेच यश आमदार प्रदीप जैस्वाल यांना मिळो. अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
