March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.20) :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगेश्वरी ता. गंगापूर येथे शिव जयंती जन्मोत्सव
विविध कला गुणांनी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी वर्ग 5 वा अ व ब चे विद्यार्थी पोवाडा व गीत गायन जोगेश्वरी शाळेच्या आदर्श शिक्षिका अर्चना भुसनळे व मीनाताई म्हसलेकर यांनी सादर केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हरिदास चव्हाण, काकासाहेब दुबिले उपस्थित होते. यावेळी वैशाली गायकवाड, संजीवनी गुजलवाड, अक्षरा हराळे, शाळेतील शिक्षक उद्धव बोचरे, दुर्गादास रोडे, समाधान तायडेसर, अर्चना भुसनळे, स्नेहल गलांडे, सविता शेवाळे, सुनिता नेमाने तसेच शालेय कमिटी अध्यक्ष सदस्य व गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिता नेमाने यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक यशवंत आवारे यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *