वाळूजमहानगर, (ता.19) – श्री गजानन प्राथमिक विद्या मंदिर व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल रांजणगाव (शेणपुंजी) या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान करून अश्वारूढ रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी लेझीम, झांज दांडपट्टा, तलवारबाजी व काठी खेळण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी भाषण, पोवाडा गायन, गीत गायन, किल्ले प्रतिकृती तयार करणे, निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा, आनंदनगरी आदींचे सादरीकरण केले. कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष आय जी जाधव यांची उपस्थिती होती. तसेच सचिव हरीश जाधव, प्रार्थमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक एम व्ही शिनगारे, बसवंतराव पाटील प्राथमिक मुख्याध्यापिका रेखा बिदरकर, मीरा देशपांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय तुपे यांनी केले तर आभार एम व्ही शिनगारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस एम हिंगणकर, कल्याण कुलकर्णी, शहाजी मंगनाळे, संजीवनी चिकाळे, अनुराधा मुळे, स्वाती सूर्यवंशी, पूजा गिरी, छाया वागदरे, अश्विनी सूर्यवंशी, जब्बार पठाण, हनुमान जाधव आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
