March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.19) – बजाजनगर येथील स्व.भैरोमल तनवानी विद्यालयात शिवजयंती निमित्त मिरवणुक, पोवाडे, लेझीम प्रात्यक्षिके व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक हनुमान भोंडवे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता हरिओम घाडगे हे उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव निमित्त पाळणा, पोवाडे, अफजल खान वध आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी झान्ज पथक व लेझिमचे प्रात्यक्षिक सादर केले. कल्याणी लांडे, शारदा पांढरे, आरती भालेराव, कार्तिकी गोराडे, श्रद्धा दामधर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक हनुमान भोंडवे यांनी बजाजनगर सारख्या भागातील विद्यार्थ्यांना चित्रपटात झळकण्याची संधी मिळवून देण्याची विनंती अभिनेता हरिओम घाडगे यांना केली. तसेच बालपणापासूनच छत्रपतींचा विचार वाचावे व ते जीवनात अंगीकारावे व प्रत्येक आईने सुद्धा आपल्या बालकांना छत्रपतींचा इतिहास सांगण्याचे आवहान केले. प्रमुख पाहुणे अभिनेता हरिओम घाडगे व सह अभिनेता गौरव कदम यांनी छत्रपती शिवरायांचे मावळे किती शक्तिशाली होते. तसेच शिवरायांचा इतिहास सर्वांनां प्रेरणादायी असून सर्वांनां छत्रपतींनी सांगितलेल्या प्रेरणादायी विचार अंमलात आणण्याचे अवाहन केले. यावेळी सहअभिनेता गौरव कदम, अक्की ओव्हाल, वर्ल्ड मराठा बिझनेसचे संस्थापक अध्यक्ष विजय काकडे पाटील, अवधूत शिंदे पाटील, न्यू सरस्वती शिक्षण संस्थेचे पदाधिकारी अशोक लगड, पंडित नवले, राजेंद्र माने, विजय उखळे,मीनाक्षी भोंडवे, सविता नवले, मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे, राजश्री कदम यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अविनाश सोनटक्के यांनी केले तर संगीता साबळे यांनी आभार मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *