
वाळूजमहानगर, (ता.14) – श्रीकृष्णाने गोपाळांना एकत्र केले, त्यांची संघटना बांधली. एकत्र शिदोरी करून ती प्रसादाच्या रूपाने सर्वांनी खाल्ली. प्रसादामध्ये ताकद असते, सामर्थ्य असते. आपल्या जीवनातील दीनता, हिनता व दुःख निवारण करून आपल्याला आनंदित करतो. तो प्रसाद असतो. म्हणून प्रसाद सेवन करताना नेहमी प्रसन्न चित्ताने सेवन करावा. असे उपदेशपर मार्गदर्शन हभप दादा महाराज वायसळ यांनी श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित सप्ताहाच्या सांगताप्रसंगी काल्याच्या कीर्तनाने सोमवारी (ता.13) रोजी कलानगर वाळूज येथे केले.

वाळुज येथील कलानगरमधील श्री गजानन महाराज मंदिरात प्रगट दिनानिमित्त त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता सोमवारी (ता.13) रोजी हभप दादा महाराज वायसळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी त्यांनी
कृष्ण गोकुळी जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ।।
होता कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ।।
सदा नाम वाचे गाती । प्रेमे आनंदे नाचती ।।
तुका म्हणे हरिती दोष । आनंदाने करिती घोष ।।
या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर काल्याचे किर्तन केले. प्रथम शिवाजीनगर परिसरातून दिंडी काढण्यात आली त्यानंतर काल्याच्या किर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. 
या कार्यक्रमास माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तुकाराम (छोटू दादा) कुंजर, गंगापूर पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, युवा सेनेचे उपतालुका अधिकारी रमेश आरगडे, विभागप्रमुख बाळासाहेब चनघटे, उपतालुकाप्रमुख मनोज पिंपळे, सुदामराव खजिनदार, सुरेश केरे, गुरुकुल शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब जाधव, चक्रपाणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमंतराव थोरात, मुख्याध्यापक भगवान पाटील, ग्रामपंचायत सदस्य राहुल भालेराव, माजी सरपंच पपीन माने, ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे, पांडुरंग बोरकर आर एस कळेकर, बालाजी देवशेटे, अनिल पंडुरे, पंढरीनाथ धनगर, अमोल ठोकळ, बिट्टू भुजंग, सुनील सूरभैया आदीसह पंचक्रोशीतील भाविक व भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिर समितीचे आर के भराड, गणेश जगताप, हभप सोमनाथ महाराज राऊत, योगेश चिमखडे, गौरव शिंदे, दत्तू इले, ज्ञानेश्वर आळंजकर, राजू आळंजकर, पांडुरंग राऊत, नामदेव मोरे, अनंता वाघ, रामदास वाघ, महेश पदार, नंदू क्षीरसागर, महेंद्र बोराडे, आकाश म्हस्के, आप्पा शेवाळे व रुस्तुम शेवाळे यांनी परिश्रम घेतले.
