March 23, 2026


वाळूजमहानगर, ता.10 (बातमीदार) – शेगाव निवासी श्री सच्चीदानंद सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या 145 व्या प्रगटदिन सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन प.पू. डॉ. साईभक्त नरहरी हलगे महाराज यांच्या विशेष अशिर्वादाने करण्यात आले आहे.

जय जयभावानी ग.नं. 11 जैन मंदिराच्या पाठीमागे, साई गणेश मंदिर, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या
तीन दिवशीय या सोहळ्यात शनिवारी (ता.11) फेब्रुवारी रोजी सायंकाळी भजन, रविवारी (ता.12) फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 5 पर्यंत चक्री पारायण व सायंकाळी विश्वजीत संगीत ग्रुप संभाजीनगर प्रस्तुत सचीन शिंदे यांचा भजन संध्या कार्यक्रम होऊन सोमवारी (ता.13) फेब्रुवारी रोजी सकाळी श्री गजानन महाराज मुर्तीचा अभिषेक व पुजन करण्यात येईल. सायंकाळी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजक मंगेश वादवाणी, भगवे वादळ प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *