March 23, 2026

वाळूजमहानगर (ता. 10) :- बजाज नगर येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या विद्यार्थ्यांनी 2023 मध्ये झालेल्या जेईई मेन (JEE MAIN) प्रथम सत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत एकूण 9 विद्यार्थी उच्चश्रेणीत आले.

यामध्ये देवेंद्र मातकर- 98.63 टक्के, ओमकार कुऱ्हाडे-93.5 टक्के, चेतन निकम-92 टक्के, श्रीनंद बांद्रे-91 टक्के, कल्याणी गाडे-90 टक्के, अंजली वाघमारे–84.5 टक्के, बसुदेव ओझा- 81 टक्के गुण मिळवून उच्च निकाल संपादन केला. विद्यार्थी आणि शिक्षक यांनी अभिमानास्पद संपादन केलेल्या या यशाबद्दल ऑर्किड संस्थेच्या वतीने चेअरमन, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व पालक यांनी अभिनंदन व कौतुक केले. तसेस भावी वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *