
वाळूजमहानगर (ता. 9) :- वाळुज येथील कलानगर, शिवाजीनगर येथील श्री गजानन महाराज मंदिररात तीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह,श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण सोहळा तथा किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 11 फेब्रुवारी शनिवारी रोजी सुरू होणाऱ्या या ज्ञानयज्ञ सोहळयाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सोमवारी (ता.13) रोजी काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.
या त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान दैनंदिन कार्यक्रमात काकडा भजन, विजय ग्रंथ पारायण, संगीत भजन, हरी पाठ, रात्री 8 ते 10 हरी किर्तन सेवा जागर दररोज रात्री हरिकीर्तन आदी कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहात शनिवारी (ता.11) हभप नागेश्वरीताई झाडे, रविवारी (ता.12) रोजी हभप कल्याण महाराज भुंजग यांचे तर सोमवारी (ता.13) रोजी सकाळी नगर प्रदक्षिणा होवुन 10 ते 12 हभप योगीराज दादा महाराज वायसळ गणेशवाडी कायगाव यांचे सुश्राव्य काल्याचे हरीकीर्तन सेवा संपन्न होऊन महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. परीसरातील भाविकांनी या ज्ञानयज्ञ सोहळयाचा लाभ घेण्याचे आवाहन सप्ताह समितीसह कलानगर, शिवशक्ती कॉलनी, शिवाजीनगर वाळूज यांनी केले आहे.
