March 23, 2026


वाळूजमहानगर (ता. 7) :- अवैध फायदा मिळवण्यासाठी लोकांच्या आरोग्यास हानिकारक होईल याची जाणीव असतांना सुध्दा गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाखु विक्री करत असल्याचे अन्न व औषध प्रशासन व वाळूज पोलिसांनी मे अर्जुन किराणा स्टोअर्स,मेन रोड वाळूज या दुकानात टाकलेल्या छाप्यात मंगळवारी (ता.7) रोजी उघडकीस आले. या छाप्यात अंदाजे 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखु यावर सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने प्रतिबंध लागु आहे. असेअसतानासुद्धा आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना व बेकायदेशीर रित्या साठवणूक करून गुटखा, तंबाखूची सर्रास विक्री वाळुज येथे दुकानात होत असल्याची माहिती एका गुप्त बातमीदार दिली. या माहीती नुसार अन्न व औषध प्रशासनाच्या ज्योत्सना जाधव व वाळूज पोलिसांनी मे. अर्जुन किराणा स्टोअर्स, मेन रोड वाळूज, ता.गंगापूर येथे मंगळवारी (ता.7) रोजी दुपारी 1.45 छापा टाकला. त्यावेळी तेथे आरोपी राजु आसाराम उचित वय 53 वर्षे दुकानात बसलेला होता. दुकानची झडती घेतली असता याचे ताब्यातून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या प्रतिबंधीत अन्न पदार्थातील 1 हजार 200 रुपये किमतीचा गोवा 1000 गुटखा, 2 हजार 730 रुपये किमतीचा हिरा पान मसाला, 198 रुपये किंमतीचा व्ही 01-टोबको, 3 हजार 840 रुपये किमतीचा प्रिमिअम राजनिवास सुगंधीत पान मसाला, 912 रुपये किमतीचा एक्स एल 01 जाफरानी जर्दा, 1 हजार 365 रुपये किंमतीचा स्थल 717 तंबाखु असा एकूण 10 हजार 245 रुपये किमतीचा प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा मुद्देमाल मिळून आला तो पंचनामा करून जप्त केला. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या ज्योत्स्ना बाळासाहेब जाधव तुमच्या फिर्यादीवरून मे.अर्जुन किराणा स्टोअर्स, मेन रोड बाळूजच्या राजु आसाराम उचित याच्या विरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *