वाळूजमहानगर, (ता.6) – राष्ट्रसंत रविदास महाराज यांची 646 वी जयंती बजाजनगर येथील मोरे चौक येथे अहिरवार चर्मकार समाज बांधवांच्या वतीने रविवारी (ता. 5) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
प्रथम संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस शांतीलाल पाठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व पूजन करण्यात आले. यावेळी निलेश बरथरे, नरसिंग करवरे, संजय खिरे, योगेश खिरे, बाळू चारभरे, राजू पल्हाटे, गोकुळ डोंगरे, शंकर बिरसोने,सुनील बिरसोने, देवलाल भगुरे,देवलाल पूर्वे, हरिचंद गणखणे, रवी बिरसोने, यश खीरे आदीसह मोठ्या प्रमाणात समाज बांधवांची उपस्थिती होती.
