
वाळूजमहानगर, (ता.5) – कारखान्याच्या हिताच्या विरोधात मी कधीच गेलो नाही, उलट कारखाना सुरू राहावा म्हणून कुंडलिकरावांना चेअरमन केले, अण्णासाहेब माने यांना मदत करण्याची विनंती केली. आणि तो म्हणतो की, मी पैसे भरण्यास सांगितले. राजकीय फायद्यासाठी पैसे घातले, त्याचा दोनदा फायदा उचलला. नुसती फेकाफेकी अन् बोल बच्चनपणा. खोटं बोलणं, रेटून बोलणं ही प्रशांत बंबची पद्धत आहे. ती आपण ओळखून घ्यावी. आणि शेतकरी विकास पॅनललाच भरभरून मतं द्या. येत्या दसऱ्याला कारखाना सुरू राहील. असे आश्वासन कृष्णा पाटील डोणगावकर यांनी रविवारी (ता.5) रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले.
गंगापूर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक सुरू असून येत्या रविवारी (ता.12) फेब्रुवारी 2023 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीतील शिवशाही शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ तुर्काबाद येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृष्णा पाटील डोणगावकर यांनी आमदार प्रशांत बंब यांचा खरपूस समाचार घेत खोटेपणाचे वाभाडे काढले. यावेळी डोणगावकर यांनी कारखान्याच्या हितासाठी शिवशाही शेतकरी विकास पॅनललाच भरभरून मतं देण्याचे आवाहन करत येत्या दसऱ्याला कारखाना सुरू राहील असे आश्वासन दिले.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप (नाना) बनकर, लक्ष्मण भाऊ सांगळे, विद्यमान संचालक कचरू पाटील शिंदे, शिवराईचे तुकाराम दादा कुंजर यांची उपस्थिती होती.
निवडणुकीतील उमेदवार –
गंगापूर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिवशाही शेतकरी विकास पॅनलकडून जामगाव गट क्रमांक 1 चे – सुरेश कचरू मनाळ (वाहेगाव), प्रवीण साहेबराव वालतुरे (नेवरगाव), कचरू काशिनाथ शिंदे (बगडी), गंगापूर गट क्रमांक 2 चे – शेख बाबूलाल अल्लाबक्ष (शिंगी), मधुकर भास्कर साळुंके (मांजरी), शेषराव मोहनराव साळुंके (मालूंजा), शेंदूरवादा गट क्रमांक 3 चे – आप्पासाहेब तुकाराम गावंडे (मांगेगाव), मनोहर रामभाऊ दुबिले (शिवपुर), प्रल्हाद किसन निरपळ (गणेशवाडी),
वाळूज गट क्रमांक 4 चे – तुकाराम दादा कुंजर (शिवराई), शेषराव भाऊसाहेब पाटेकर (तुर्काबाद), दिलीप भाऊसाहेब बनकर (अंबेलोहळ), लासुर स्टेशन गट क्रमांक 5 चे – कारभारी सखाहारी गायके (सुलतानाबाद), दादासाहेब कारभारी जगताप (गोपाळवाडी), कृष्णा साहेबराव पाटील (डोणगावकर) तसेच इतर मागासवर्ग – नामदेव धोंडीराम दारुंटे (मुद्देश वाडगाव), विमुक्त जाती, भटक्या जमाती – देवचंद हिरालाल राजपूत (शंकरपूर), महिला प्रतिनिधी – माया संदीप दारुंटे (गंगापूर),
https://youtu.be/oNskSklWcyM
शोभाताई सुभाष भोसले (गोळेगाव), अनुसूचित जाती जमाती – काशिनाथ सुदामराव गजहंस (डोणगाव) असे वीस उमेदवार रिंगणात आहेत.
