March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.4) – कारखान्याच्या शेजारी तार कंपाऊंड करून शेतात जाण्याचा रस्ता बंद का केला ? याचा जाब विचारण्यासाठी दोन शेतकऱ्यांनी बळजबरीने कारखान्यात घुसून केबिनमध्ये बसलेल्या कारखान्याच्या एमडी (मॅनेजिंग डायरेक्टर) ला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ही घटना शुक्रवारी (ता.3) रोजी सकाळी 10.30 ते 11.30 वाजेच्या सुमारास मुक्तेश्वर शुगर मिल येथे घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धामोरी येथील मुक्तेश्वर शुगर मिल या कारखान्याच्या पूर्व दक्षिण बाजूस गेल्या आठवड्यात तार कंपाऊंड केले आहे. हे तार कंपाऊंड केल्यामुळे शेतात जाण्या-येण्या करीता रस्ता नाही, आम्हाला शेतात ये जा करण्यासाठी येथून रस्ता द्या. असे म्हणून कल्याण सुकासे व नितीन सुकासे या शेतकऱ्यांनी तार कंपाऊंड तोडुन तेथील सामान टिकाव, फावडे बाजुला फेकुन दिले व सुनिल बाळाकुष्ण चादसकर व कर्मचार्याला शिवीगाळ करुन धक्का बुक्की केली. तसेच कंपनीच्या गेटमधून बळजबरीने कारखान्यात घुसून कारखान्याच्या एमडी (मॅनेजिंग डायरेक्टर) केबिनमध्ये जाऊन तार कंपाउंड केल्याचा जाब विचारत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. हा प्रकार शुक्रवारी (ता.3) रोजी सकाळी साडेदहा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास मुक्तेश्वर शुगर मिल धामोरी येथे घडला. या प्रकरणी सेक्यूरिटी गार्ड सचिन सुभाष गाडेकर याच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी कल्याण सुकासे व नितीन सुकासे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सय्यद हनीफ करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *