March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.2) :- दिलेले पैसे आम्हाला न देता पळून जा. असे का? म्हणाला असा जाब विचारत दोन जणांनी 26 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कोयत्याने डोक्यात मारून त्याच्यावर प्राण घातक हल्ला केला. ही घटना गुरुवारी (ता.2) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पांढर ओहळ येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी इमरान शेख व इरफान शेख रा. सावखेडा तालुका गंगापूर यांनी लुचारी यास उसने पैसे दिले होते. ते इरफान व इमरान यांना न देता तू पळून जा. असे का? म्हणाला. या कारणावरून तसेच जुन्या भांडणाच्या वादावरून आरोपी इमरान शेख व इरफान शेख यांनी शुभम भानुदास जाधव (वय 26) रा. सावखेडा. याला शिवीगाळ करून हाता चापटाने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन लोखंडी कोयता शुभम जाधव यांच्या डोक्यावर पाठीमागून मारून प्राण घातक हल्ला केला. ही घटना पांढर ओहळ येथील लीपाने याच्या दुकानाजवळ गुरुवारी (ता.2) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी शुभम भानुदास जाधव याच्या फिर्यादीवरून आरोपी इरफान शेख व इमरान शेख यांच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील इरफान इसाक शेख वय 27 या आरोपीस वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे करीत आहे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *