
लिंबेजळगांव (ता.1) : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज अनुग्रह दिना निमित्त गंगापूर तालुक्यातील शिवराई येथील जागृत दक्षीणमुखी हनुमान मंदीरात हभप रामायणाचार्य श्री संजय महाराज कुर्हाडे यांचें सुश्राव्य हरीकीर्तन सेवा सकाळी 10 ते 12 संपन्न झाली.
किर्तनात नंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास ह भ प कृष्णा महाराज भवर, ह भ प नवनाथ महाराज भवर, मनोज जोशी गुरु, शिवाजी निरपळ, प्रकाश पाटील हाडुळे, गणपतराव कानडे, रंगनाथ हिवाळे, दत्तु जाधव, देविदास दुबीले आदींसह भजनीं मंडळी तसेच शिवराई, रामनगर, लिंबे जळगाव येथील नागरीकांची उपस्थिती होती.
