
वाळूजमहानगर, (ता.1) – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संजीवनी क्रिएशनच्या वतीने आयोजित भव्य जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेस जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. यावेळी पालकसुद्धा होते. चित्रकार हर्षद खांड्रे यांच्या संकल्पनेतून संजीवनी कला मंदिर सिडको वाळून महानगर -1 तेथे ही स्पर्धा झाली.

26 जानेवारी गुरुवारी रोजी घेण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास सचिन खानचंदानी, विजय सिरसागर आणि त्रिकांत खोने हे प्रमुख पाहूणे होते. यावेळी चित्रकार राजू मोरे, भीमराव वाठोरे, शिल्पकार राज शेजवळ यांनी या स्पर्धेचे परिक्षण केले. स्पर्धकांपैकी कस्तूरी वानोडे, विश्वा जोशी आणि प्रणव रसाळ यांनी प्रथम परितोषिक पटकावले. पालकांपैकी पोपटराव रसाळ यांनी पालकांचे व स्पर्धकांचे कौतूक केले. हर्षद खांडे यांनी विद्यार्थ्यांना डिझाईनिंग क्षेत्रातील करिअर संदर्भात मार्गदर्शन केले.

तीन गटात ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली त्या अ – गट 1 ते 4 (वय वर्ष 5-9), ब – गट 5 ते 9 ( वय वर्ष 10-14), क – गट 10 ते पुढे सर्व वयासाठी आहे. सर्व गटांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक त्याचबरोबर चार उत्तेजनार्थ असे एकूण 24 बक्षीस संख्या आणि सर्वोत्कृष्ट 3 स्पर्धकांना 1 महिन्याचा कोर्स मोफत शिकवला जाणार असल्याचेही संयोजकांनी सांगितले.
फोटो ओळ – सिडको वाळूज महानगर येथे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी.
