
वाळूजमहानगर, (ता.30) – नव्यानेच लग्न झालेल्या एका वीस वर्षीय विवाहितेने छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बजाजनगर येथील आर एल 106 कनकधारा सोसायटी मध्ये घडलेली ही घटना सोमवारी (ता.30) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कनकधारा हाऊसिंग सोसायटी बजाजनगर येथील अंजली बिरेन्द्रसिंग गौतम वय 20 मुळ रा. कानपूर उत्तर प्रदेश हिचे सुमारे अडीच महिन्यापूर्वी लग्न झाले होते. पतीबरोबर तिचा वाद झाल्याने तिने घरातील पंख्याला ओढणीच्या साह्याने सोमवारी (ता.30) रोजी गळफास घेतला. बराच वेळ दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकाऊन पाहिले असता अंजलीने गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह घाटीत दाखल केला असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अडीच महिन्यापूर्वी लग्न –
अंजली गौतम हीचे रोहित आव्हाड याच्यासोबत प्रेम संबंध होते. सुमारे अडीच महिन्यापूर्वी अंजलीचा रोहित कारभारी आव्हाड याच्यासोबत प्रेम विवाह झाला. परंतु दोघांमध्ये वाद झाल्याने अंजली आईकडेच राहत होती.
