
वाळूजमहानगर, (ता.28) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत श्री गजानन प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक ज्युनिअर कॉलेज आणि बसवंतराव पाटील प्राथमिक माध्यमिक इंग्लिश स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन गुरुवारी (ता.26) रोजी उत्साहात साजरी करण्यात आला. प्रथम संस्थापक अध्यक्ष आय.जी जाधव आणि प्रमुख अतिथी बजाज ऑटोचे मुख्य अधिकारी उदय कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सकाळी सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी लेझीम डान्स व ढोल ताशाच्या गजरात उत्साहात प्रभातफेरी काढण्यात आली. यात सर्व विद्यार्थी शिक्षक सहभागी झाली होते. शाळेत भाषण स्पर्धा, गायन स्पर्धा व कवयित्री डंबेल्स, झांज, लेझीम तसेच कराटेचे प्रात्यक्षिके दाखवले. या प्रसंगी बजाज ऑटोचे अधिकारी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यार्थी कसा घडला पाहिजे. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव हरीश जाधव, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एम व्ही शिनगारे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे आणि बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका रेखा बिदरकर आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापिका मुख्याध्यापक बी व्ही. शिरसाठ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय तुपे तर आभार मीरा देशपांडे आणि डी एम पठारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन रेळेकर, प्रशिक्षक जब्बार पठाण, कराटे प्रशिक्षक राहुल दोंदे, संदीप हिंगणकर, शहाजी मगनाळे, हनुमंत जाधव, कल्याण कुलकर्णी, विशाल जाधव, अशोक तारडे आदींनी परिश्रम घेतले.
