March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.27) – वाळुज येथे विविध ठिकाणी विविध कार्यक्रम, उपक्रमाने भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व हर्षोल्हासात गुरुवारी (ता.26) रोजी साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत परिसरातून प्रभात फेरी काढली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या कलागुणांना वाव देत अनेकविध बक्षिसे पटकावली. मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून त्यांचे कौतुक करण्यात आले.

प्रथम वाळुज ग्रामपंचायत येथे सरपंच सईदाबी पठाण यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी वाळूज ग्रामपंचायतच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त व्यवस्थित नियोजन आले होते. कामगार कल्याण केंद्र येथे कामगार भगवान गाडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची फेरी येथील

जीवनलाल पाटणी प्रवेशद्वारा जवळ गेली तेथे उपसरपंच योगेश आरगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. झेंडा मैदान येथेही प्रजासत्ताक दिनानिमित्त सुभाष बोहरा यांच्या हस्ते ध्वज वंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे वाळूज पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद प्रशालेत प्रभारी मुख्याध्यापिका निवेदिता ठाकूर यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात येऊन राष्ट्रगीत झाले. यावेळी प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सुंदर वेशभूषा परिधान करून लेझीम कार्यक्रम घेतला. इयत्ता पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर टिपरी नृत्य केले.

प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी भाषांमधून भाषण केले. दोन दिवसापूर्वी प्रशालेत झालेला वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शालेय समितीच्या वतीने शाळेतील शिक्षक शिवकुमार जयस्वाल, निवेदिता ठाकूर, चंद्रकांत गवळी, अण्णा जगताप, फैजूनिसा खान, प्रमुल पाटील, मीरा घुगे, प्रमोद बोरसे, मिलिंद देशमुख, रामानंद ढोमने, सुनीता जोशी, भारती वाघमारे, संगीता खरात, शीला मोटे, ऑटोमोबाईलचे शिक्षक मनोज मार्कंडेय, हेल्थकेअरच्या शिक्षिका अनुजा कोलारकर, उर्दू माध्यमचे शिक्षक खान रईसा, अमेर सिद्दिकी, शेख बुशरा, मराठी माध्यमचे शिक्षक अण्णा तुपे आदी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमास सरपंच सईदाबी पठाण, उपसरपंच योगेश आरगडे, ग्रामविकास अधिकारी उत्तम भोंडवे, ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे, नदीम झुंबरवाला, फैयाज कुरेशी, बबलू पठाण, इस्माईल पठाण, अमजदखान पठाण, तौफिकक पटेल जिल्हा परिषद सदस्य रामदास पडळकर, माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन मुकेश बोहरा, संचालक तथा तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष काकासाहेब चापे पाटील, माजी सरपंच सर्जेराव भोंड, माजी सरपंच उदय पाटील, नंदू सोनवणे, विजय साबळे, शालेय समितीचे बबनराव गायकवाड, शरदचंद्र अभंग, नंदकुमार राऊत, अविनाश गायकवाड आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रमुल पाटील यांनी केले तर आभार चंद्रकांत गवळी यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *