February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.24) – राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बजाजनगर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस कादरी उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विलास मालोदे, अरुणा चौधरी, कैलास मोरे, अनिता बोबडे यांची उपस्थिती होती.

यावेळी एस एस कादरी यांनी सांगितले की, नेताजी सुभाष चंद्र बोस हे हिंदुस्तानचे बावनकशी हिरा होते, भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुभाष चंद्र बोस यांचे योगदान हे महत्त्वाचे होते. देशात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला त्यावेळेस त्यांनी जनतेला तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा. असे आव्हान केले होते. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजा विरुद्ध रणसिंग फुंकले तसेच मराठी अस्मिता, मराठी माणूस यासाठी आयुष्य वेचणाऱ्या बाळासाहेबांनी कधीही सत्तेचा विचार केला नाही. मराठी अस्मिता जिवंत राहिली पाहिजे, मराठी माणूस टिकला पाहिजे. त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी घालवले. म्हणून त्यांना हिंदुहृदयसम्राट असे संबोधले जाते. व आजही ते प्रत्येक हिंदूंच्या हृदयात आहेत. असे मत डॉ.कादरी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉक्टर विलास मालोदे, एस पी सुरडकर, के पी मोरे, नाना इंगळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास मालोदे तर आभार अरुणा चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिता सोळंके, रंजना बावचे, जयश्री शेजुळ, माधुरी कुलकर्णी, मयुरी बहिरट, गोपीचंद गायके यांनी परिश्रम घेतले.
——————-

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *