
वाळूजमहानगर, (ता.23) – पोलिसात तक्रार करण्याच्या कारणावरून दुकानातून सामान घेऊन घरी जाणाऱ्या एका तरुणासदोन जणांनी शिवीगाळ करून हाताचापटाने व डोक्यात लाकडी दांड्याने मारून डोके फोडले. ही घटना रविवारी (ता.22) रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास खवड्या डोंगर येथे घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खवड्या डोंगर, तीसगाव येथील सकाहरी काशिनाथ पवार वय 30 हा रविवारी (ता.22) रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दुकानातून सामान घेवुन घरी जात होता. त्याच वेळी राजू भालेराव व त्याचे सोबत असलेल्या इशाल या दोघांनी तु माझ्या विरोधात पोलीसात तक्रार का दिली. असे म्हणन पवार याला शिविगाळ केली. त्यास समजावुन सांगत असतांना राजू व इशाल यांनी प्रथम हाताचापटाने मारहाण केली. व नंतर राजूने लाकडी दांड्याने डोक्यावर मारले. डोक्यावर मारल्याने डोके फुटुन रक्त निघु लागले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
