
वाळूजमहानगर, (ता.14) – बजाजनगर येथील ज्ञानभवन इंग्लिश स्कुल या शाळेमध्ये स्वराज्यप्रेरिका जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम गुरुवारी (ता.12) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष किशनचंद तनवाणी, सचिव हनुमान भोंडवे, प्रमुख पाहुणे संतोष उगले, तसेच तनवाणी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे, ज्ञानभवनचे विभाग प्रमुख वैभव पवार, मुख्याध्यापिका शारदा बडे, अशोक मुटकुळे, दैवशाला कदम, नवनाथ कर्डिले उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये ज्ञानभवन इंग्लिश स्कुलचे 4 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळवला. त्यापैकी सृष्टी अशोक मुटकुळे
शिष्यवृत्तीधारक जिल्ह्यातून प्रथम (इंग्रजी माध्यम)
तसेच (नवोदय पात्र). सार्थक शामसुंदर चाळक हा
(शिष्यवृत्तीधारक जिल्ह्यातून द्वितीय) (इंग्रजी माध्यम)
तसेच( नवोदय पात्र). संदेश सोपान गाढे
(शिष्यवृत्तीधारक) व हर्षवर्धन संभाजी कदम
(शिष्यवृत्तीधारक) यांचा समावेश आहे.
कार्यक्रमानिमित्त मान्यवरांनी आईसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जिवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
