वाळूजमहानगर, (ता.14) – कै. तेजरावजी पाटील निकम बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित, रायझिंग स्टार इंग्लिश स्कूलचे पंधरावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. यात बाल वर्ग ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
यावेळी विविध सांस्कृतिक नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केली. त्यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमाचा आनंद घेत होते. कार्यक्रमाची सुरुवात शहीद जवानांना अभिवादन करून करण्यात आली. तीन तासाच्या यशस्वी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून देशाविषयी बंधुता आणि प्रेम यांचा संदेश दिला. यावेळी दहावी परीक्षेमध्ये शाळेतून पहिले आलेल्या तीन विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, शाळेचे अध्यक्ष सुभाष निकम, जिल्हा परिषद प्रभारी दिलीप निकम, शिवविख्याते संजय गायकवाड, संदिप चिखले, प्रदीप जगताप, भाग्यश्रीताई औताडे, सरपंच सविताबाई निकम, मुख्याध्यापक हरी जमाले, अरुण निकम, संदीप चव्हाण, अतुल निकम, मुख्याध्यापिका कावेरी निकम, स्वाती लहाने, स्वाती निकम, प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती निकम व रोहिणी जगदाळे यांनी केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमधून कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.
