March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.12) – भगवान महावीर स्कूल बजाजनगर येथे 15 वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. दोन वर्षांनंतर विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळाला. तो शाळेच्या स्नेहसंमेलन निमित्ताने. सोहळा सोनेरी आठवणींचा… माधूर्याचा, या थीम वर आधारित उत्तम असे कलाविष्कार विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लायन्स क्लब औरंगाबादचे चेअरमन तनसुख झांबड उपस्थित होते. त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष डॉ शांतीलाल सिंगी, उपाध्यक्ष पद्माकर कदम, सचिव पारस चोरडिया, प्रणयकुमार देशमाने, संभाजी राचूरे, किशोर राका, अनंतराव घडामोडे, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी सांगोले हे उपस्थित होते.


जिना यहा मरणा यहा, जारे हट नटखट, लख लख चंदेरी, मेरा जुता है जपानी तसेच सुंदर असा कठपुतली नृत्य सादर केले गेले. कार्यक्रमात पूर्व प्राथमिक ते 10 वी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी शाळेतील शिक्षकांना आदर्श शिक्षक व उत्तम कर्मचारी असे अवॉर्ड ही देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पासाहेब काकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावंडे बेबी, रत्नमाला येवेलकर, अनुराधा पवार, विशाल कांबळे, संगीता काकडे, अविनाश बोरकर, मनिषा दुशिंग, अमिल कंठवार यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *