March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.12)  – मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे जेष्ठ विश्वस्त एस.एम. देशमुख, किरण नाईक, राज्याध्यक्ष शरद पाबळे यांच्या मार्गदर्शनाने औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार परिषदेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या वर्षात जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने विविध समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जेष्ठ पत्रकार तथा विभागीय सचिव बालाजी सूर्यवंशी यांनी दिली.

नूतन वर्षातील कार्यकारिणी ही दोन वर्षासाठी असून जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी आपली सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. आगामी काळात पत्रकारांचे अधिवेशन तसेच पत्रकार हिताच्या विविध योजना पात्र पत्रकारांसाठी राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा पत्रकार परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

दोन वर्षासाठी असलेली कार्यकारणी अशी – सुनीलचंद्र वाघमारे (अध्यक्ष), कानिफ अन्नपूर्णे (सचिव), उपाध्यक्ष : माणिक साळवे, महादेव जामनीक, बद्रीनाथ खंडागळे (पैठण), संजय कुलकर्णी (सिल्लोड), सहसचिव : प्रकाश भगनुरे, विजय हिवराळे, विठ्ठल शिरसे (कन्नड), शैलेंद्र खैरेमोडे (वैजापूर), कोषाध्यक्ष : ब्रम्हानंद चक्करवार, सहकोषाध्यक्ष : रऊफ शेख (फुलंब्री), सुभाष पाटोळे, संघटक : बशीर पठाण (सिल्लोड), रामराव (आर के) भराड (वाळूज), लालखाँ पठाण (गंगापूर), विजय चौधरी (खुलताबाद), संजय महाले, भानुदास मते, प्रसिद्धी प्रमुख : सचिन एस.अंभोरे, मुंबई प्रतिनिधी : मनोज पाटणी. यांची निवड करण्यात आली असून नुतन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *