March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.11) – व्यक्तींचा वाढदिवस, लग्न वाढदिवस साजरे करून तोंडाला केक फासण्यापेक्षा गरजवंत विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त एक पेन जरी भेट म्हणून दिला तरीही वाढदिवसाचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल. कारण आपण समाजात जेव्हा वावरतो, मोठे होतो. आपण समाजाकडून कळत न कळत खूप काही घेतो, त्यामुळे आपले कर्तव्य आहे. म्हणून समाजातील समतोल साधण्यासाठी आपण समाजाला काही तरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे भविष्य घडू शकेल. असे आवाहन समाज सेवक तथा इप्का लॅबोरेटरीज लिमिटेडचे मानव संसाधन विभाग प्रमुख व्यंकट मैलापुरे यांनी केले.

शिक्षणापासून कोणताही घटक वंचित राहू नये, म्हणून वाळूज औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरीज लिमिटेडचे मानव संसाधन विभाग प्रमुख तथा समाजसेवक व्यंकट मैलापुरे यांनी मंगळवारी (ता.10) रोजी “बिना छताची शाळा” या उपक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा धनादेश दिला. यावेळी श्री मैलापुरे हे बोलत होते.

स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी करत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परिक्षेची तयारी करणारा भगवान सदावर्ते दिवसातून 3 ते 4 तास वेळ काढून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करत आहे. ज्यामध्ये 5 ते 14 वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यासाठी बाल अंकुर बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था नोंदणी केली. परंतु संस्थेचे खाते उघडण्यासाठी लागणारे 10 हजार रुपये सदावर्ते भरू शकत नव्हता. त्यांनी समाजसेवक व इप्का लॅबोरेटरीज लिमिटेडचे मानव संसाधन विभाग प्रमुख व्यंकट मैलापुरे यांची भेट घेऊन त्यांनी चालू केलेल्या “बिना छताची शाळा” उपक्रमाबद्दल माहिती दिली व शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी येणाऱ्या अडचणीची बाराखडी मैलापूरे यांच्याकडे मांडली.

मैलापूरे यांनी त्याच्या कार्याची दखल घेऊन कंपनीच्या सीएसआर फंडातून 35 हजार रुपयांचा धनादेश 10 जानेवारी 2023 रोजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुपूर्त केला. त्यातील 10 हजार रुपये संस्थेचे खाते उघडण्यासाठी व उर्वरित रक्कमेतून विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या शालेय उपयोगी चटई, खडू, बोर्ड, वह्या, पेन ,दप्तर इत्यादी वस्तू खरेदी केल्या.

यावेळी मैलापुरे यांनी विद्यार्थ्यांची दिलखुलास संवाद साधला, त्यावेळी विद्यार्थ्यांनी चित्रकला वह्या व रजिस्टर नसल्याचे सांगितले. मैलापुरे यांनी तात्काळ दखल घेऊन त्यांना चित्रकला व रजिस्टर पेनचे वाटप केले. यावेळी बाल अंकुर बहुउद्देशीय सेवा शिक्षण संस्थेचे संस्थापक भगवान सदावर्ते यांनी इप्का लॅबोरेटरीज लिमिटेडचे आभार मानले. या कार्यक्रमास इप्का लॅबोरेटरीजचे एकनाथ पवार, प्रफुल्ल कांबळे, बाल अंकुरचे केशव सांगळे आणि विध्यार्थी उपस्थित होते.

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *