March 23, 2026


वाळूजमहानगर, ता.10 (बातमीदार) – वाळूज औद्योगिक परिसरातील विजय शिनगारे यांची बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी)च्या जिल्हा उपाध्यक्ष पदावरून बढती करत औरंगाबाद जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष अँड. डॉ.सुरेश माने यांनी शिनगारे यांना या निवडीचे पत्र शुक्रवारी (ता.6) रोजी दिले.

मराठवाडा विभागीय प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता बैठक शुक्रवारी (ता.6) जानेवारी रोजी घेण्यात आली. या बैठकीत विजय शिनगारे यांना ही बढती देण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महासचिव अरविंद भाऊ कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष अज्जू भाई, मराठवाडा उपाध्यक्ष एकनाथ बत्तीसे, औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष शेख आजीमभाई वणीकर, जिल्हा उपाध्यक्ष अनामी मोरे, अँड. राहुल जडे, राहुल जाधव, त्रिक्षण गायकवाड, शुभम नवगिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पक्षाशी कटिबद्ध राहील – शिनगारे

माझ्यावर टाकलेल्या विश्वासास मी सार्थ ठरेल. तन-मन-धनाने व मान, अपमानाची, सन्मानाची पर्वा न करता फुले,शाहू,आंबेडकरी सामाजिक व राजकीय परिवर्तनाचे बहुजन आंदोलन यशस्वी करण्यासाठी मी कटीबद्ध राहील. असे आश्वासन नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष विजय शिनगारे यांनी यावेळी दिले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *