February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.3) – खास मकर संक्रांती निमित्त आपल्यासाठी औरंगाबाद येथील नामांकित राणीज् कलेक्शनच्या वतीने आयोजित केलेल्या साडी सेलचे उद्घाटन मोठ्या उत्साहात मंगळवारी (ता.3) रोजी करण्यात आले. या साडी सेलमध्ये खरेदीसाठी महिलांची गर्दी होत आहे.

सम्यक गार्डन, पंढरपूर येथील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र मिनियार यांच्या हस्ते या साडी सेलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुनील दरख, विद्या सारडा, ज्योती भंडारी,

 

 

विशाखा बडजाते, ज्योती गायकवाड, छाया जाधव, आप्पासाहेब हिंगमिरे आदींसह महिला ग्राहकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

फॅन्सी व वेगवेगळ्या डिझाईनच्या आकर्षक साड्यांचे हे प्रदर्शन मंगळवारी व बुधवारी अशा दोनच दिवस चालणार आहे. विशेष म्हणजे या साडी सेल मध्ये खरेदी करणाऱ्या प्रत्येक महिलांना लकी ड्रॉ कुपन देण्यात येणार असून त्यावर मोठ्या प्रमाणात बक्षीसांचीही लयलूट होणार आहे.

त्यामुळे परिसरातील महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन राणीज् कलेक्शनच्या वतीने विद्या सारडा व सुनील दरख यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *