February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.29) – गरवारे कम्युनिटी सेंटर वाळूज तर्फे १८ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण भागातील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकनृत्य स्पर्धेत
वाळूज येथील शिवराई आश्रम शाळेचा प्रथम क्रमांक आला. जिल्हा परिषद प्रशाला रांजणगाव द्वितीय तर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्रशाला वाळूज यांचा तर चौथा क्रमांक जिल्हा परिषद प्रशाला वाळूजवाडी यांचा तर पाचवा क्रमांक भगवान महावीर स्कूल बजाजनगर यांनी प्राप्त केला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सइदाबी पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवने, परीक्षक सुधीर बहिरगावकर, विक्रांत वायकोस, वाळूजचे केंद्र प्रमुख मिथिन चव्हाण, छावणी सेंटरचे प्रमुख रमाकांत रौताल्ले आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत एकूण १५ संघ सहभागी झाले होते. या प्रसंगी विद्यार्थांनी गोंधळ, लावणी, भारुड, पोवाडा, आदिवासी नृत्य, पोतराज नृत्य, वासुदेव नृत्य, आदि नृत्य सदर केली.
याप्रसंगी सेंटरच्या लोककला विभाग तर्फे शाहीर अजिंक्य लिंगायत यांच्या समूहाने लोककलेचा संच सदर करण्यात आला.

बक्षीस वितरण प्रसंगी गरवारे उदोय्ग समूहाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक ए सी यावलेकर तसेच गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवने, परीक्षक सुधीर बहिरगावकर, विक्रांत वायकोस, वाळूज केंद्र प्रमुख मिथिन चव्हाण, छावणी सेंटर प्रमुख रमाकांत रौताल्ले, अजिंक्य लिंगायत होते.

याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना यावलेकर यांनी सांगितले की, मुलांनी स्पर्धातून कायम शिकले पाहिजे जर यश आले तर खूप भरून न जाता ते यश कायम टिकवता आले पाहिजे आणि अपयश आले तरी खूप न खचता मुलांनी पुन्हा नव्याने पर्यंत केले पाहिजे. त्यात बदल करून नक्की यश प्राप्त केले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मिथिन चव्हाण यांनी केले तर आभार रमाकांत रौताल्ले यांनी मानले. कार्याक्रमसाठी प्रवीण कुलकर्णी, रामेश्वर वल्ले यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *