February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.23) – कंपनीच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश करत तीन चोरट्यांनी कंपनीतील अंदाजे 27 हजार रुपये किमतीचे 60 पितळी वाल चोरून नेले. वाळुज औद्योगिक वसाहतीतील निपाँन सँन्सो या कंपनी शनिवारी (ता.17) रोजी सकाळी 4.30 ते 5 वाजेच्या सुमारास ही चोरी घटना झाली.

वाळुज औद्योगिक वसाहतीतील एम.86 येथील निपाँन सँन्सो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मधुन अंदाजे 27 हजार रुपये किमतीचे पितळ या धातूचे एकुण 60 नग सिलेंडर वाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्दाने स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेले. शनिवारी (ता.17) रोजी पहाटे 4.30 ते 5 वाजेच्या सुमारास झालेल्या या चोरी प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक प्रशांत प्रकाश कुमार (वय 25) रा. सिडको वाळूज महानगर -1 त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.23) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरटे सीसीटीव्हीत
दरम्यान या चोरीचा घटनाक्रम वाळूज औद्योगिक परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेरा आला आहे. शनिवारी (ता.17) पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरटे कंपनीच्या संरक्षण भिंतीवरून उड्या मारून आत आले व आतील ऐवज चोरून नेला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *