
वाळूजमहानगर, (ता.17 – बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या रांजणगाव (शेणपुंजी) शहर प्रमुखपदी माजी उपसरपंच बाबासाहेब बटुळे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषद बांधकाम सभापती विलास बापू भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख दिलीप निरफळ यांच्या हस्ते बटुळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
ही निवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या आदेशाने करण्यात आली. बाबासाहेब बटुळे हे रांजणगावचे माजी उपसरपंच असून त्यांना राजकारणाचा तगडा अनुभव आहे. त्यांची रांजणगाव शहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मण वैष्णव, संजय मंजुळे, विजय तोगे, अक्षय ढोले, जालिंदर सोनवणे, हरिदास चव्हाण, अर्जुन चौधरी, संतोष चोले, योगेश वाघमारे, निलेश देवकर, बाळू शिवणेकर, नेमा महाजन, रामेश्वर राठोड, गजानन पवार, उमेश भालेराव, सागर तोगे, शाम चिञे, बाळु सुर्यवंशी, सदिप वैष्णव, आप्पा भागवत, रवीद्र काजळे, संदीप काकडे, संतोष काजळे, पृथ्वीराज काजळे आदींनी बटुळे यांचे स्वागत केले आहे.
………………
