February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.16) – भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेच्या राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात बजाजनगर येथे महिला बाल सुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. एस एस कादरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, पोलीस उपनिरीक्षक स्वाती राऊत यांची उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संदीप गुरमे यांनी सांगितले की, विद्यार्थी अवस्थेमध्ये विद्यार्थी हा शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असला पाहिजे, उज्वल भवितव्य घडवण्याचे हे सध्याचे वय आहे. या वयामध्ये फेसबुक, व्हाट्सअप अशा सोशल मीडियापासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर करू नये. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः वाहतुकीचे, महाविद्यालयाचे नियम पाळावे व आपल्या पालकांसोबत आपल्या मनातील सर्व बाबींची चर्चा करावी. असे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक स्वाती उचित यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे, आई-वडिलांनी मोठ्या इच्छाआकांक्षा उराशी बाळगून तुम्हाला शिकवण्यासाठी पाठवले आहे. त्यांचा अपेक्षाभंग कधी होणार नाही, यासाठी आपण मनापासून प्रयत्न करावा व समाजामध्ये वावरताना गुड टच, बॅड टच काय असतो. याची माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती असणे गरजेचे आहे. असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख जयश्री शेजुळ यांनी केले. तर आभार डॉ- विलास मालोदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास मोरे, विद्या उगले, अनिता बोबडे, शारदा खरात, रंजना बावचे, अशोक जगताप, गोपीचंद गायके यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *