February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.15) – घरातील किचन रूम मध्ये पुरून ठेवलेला मृतदेह बुधवारी वाळुज येथे दुपारी रोजी आढळून आला होता. यातील संशयित आरोपी मांत्रिकाला वाळूज पोलिसांनी जीवाची पराकाष्टा करत अवघ्या बारा तासाच्या आत पंढरपूर येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता या मृतदेहाला वेगळीच कलाटणी मिळाली असल्याचे गुरुवारी (ता.15) रोजी पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

वाळुज येथील समता कॉलनीत राहणाऱ्या सूर्यकांत शेळके यांच्या घरात किरायाच्या रूममध्ये काकासाहेब नामदेव भुईगड (49) हा कुटुंबासह राहत होता. तो पूजा आर्चा व छु छा करत असे. नवरात्र मध्ये तो गावी गेला तेव्हापासून त्याचे घर बंद होते. घर बंद आहे व किराया सुद्धा देत नाही. म्हणून घर मालक शेळके यांनी घराचे कुलूप तोडले असता घरातील किचन रूम मध्ये पुरलेला मृतदेह समोर आला. या खळबळ जनक घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे तेज करत संशयित आरोपी काकासाहेब भुईगड यांच्या शोधार्थ दोन पथके तयार केली. या पथकाने जीवाची पराकाष्टा करत अवघ्या बारा तासात भुईगड यास ताब्यात घेतले असता त्याने दिलेल्या माहितीवरून या घटनेला वेगळीच कलाटेनी बसली. याबाबत पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले की, संशयित आरोपीस आम्ही ताब्यात घेतले आहे त्याच्या म्हणण्यानुसार वाळुज येथे तो, त्याची पत्नी, एक मुलगी व सासू असे चार जण राहत होतो. किचन मध्ये सापडलेला मृतदेह हा त्याच्या पत्नीचा आहे. अनिता काकासाहेब भुईगड (35) असे तिचे नाव आहे. अनिता ही अपंग होती. ती सतत आजारी असत, मृत्यूपूर्वी तिने दीड महिन्यापासून काही खाल्ले नव्हते असेही संशयित सांगतो. तिचा 22 ऑगस्ट 2022 रोजी नैसर्गिक मृत्यू झाला. मात्र आमच्याकडे तिच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते, म्हणून आम्ही तिचा मृतदेह किचनमध्ये पुरला.

            तरीही होणार गुन्हा दाखल
घरात आढळलेल्या मृताचा जरी हा नैसर्गिक मृत्यू असला, तरीही मृतदेह घरात पुरता येत नाही. त्याचा रीतसर अंत्यसंस्कार करणे किंवा होणे गरजेचे आहे. संशयित आरोपीने मृतदेह घरात पुरुन ठेवला. हा गुन्हा आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होईलच. असे पोलीस निरीक्षक संचिन इंगोले म्हणाले.

 

व्हिसेरा राखून ठेवला
दरम्यान किचन रूम मध्ये मिळून आलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन गुरुवारी (ता.15) रोजी करण्यात आले. त्याचा रिपोर्ट अद्याप बाकी आहे, पोलिसांच्या म्हणण्यानुसार या मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्याचा अहवाल येताच मयताचे गुढ उलगडणार आहे.

मोबाईल मुळे आला जाळ्यात –
घटनेनंतर खोलीला बाहेरून कुलूप लावून संशयित वाळूज येथून फरार झाला होता. मात्र त्याचा मोबाईल सुरूच होता. ब्राह्मण नसतानाही तो पूजा अर्चा व आजारी व्यक्तीला बरे करतो असा बनाव करत होता. हाच धागा पकडून त्याच्या मोबाईलवर वाळूज पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून माझे नेहमी डोके दुखत असते. असे म्हणून त्याला फोन केला असता तो पोलिसांच्या जाळ्यात आला.

  दोन पथके संशयताच्या शोधात रवाना
वाळूज येथे किचन रूम मध्ये आढळून आलेल्या मृतदेहामुळे सर्वत्र खळबळ उडाली. त्यामुळे पोलिसांचीही झोप उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात, वाळूज ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांनी तपास चक्रे तेज करत दोन पथक तयार करून आरोपीच्या शोधात तात्काळ रवाना केले.

बारा तासात संशयित आरोपी ताब्यात
आरोपीच्या शोधार्थ रवाना झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस अंमलदार श्रीकांत सपकाळ, आनंद वाहुळ, नितीन धुळे, किशोर साबळे, विजय पिंपळे, गणेश लक्कस व सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संदीप पाटील यांच्या पथकाने जीवाची पराकाष्टा करत आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.

अहवालानंतर उलगडणार गुड
किचन मध्ये पुरलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या या मृतदेहा प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. या तील मयताच्या शवविच्छेदनानंतर येणाऱ्या अहवालावरून घटनेचे गुढ उलगडणार आहे.

………….

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *