February 5, 2026

 


वाळूजमहानगर, (ता.5) :- वाळुज औद्योगिक वसाहतीतील परफेक्ट टुलिंग कंपनीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त योगेश पाटील व गोपाल पाटील यांनी त्यांच्या कंपनीत काम करणारे दिव्यांग कामगार किशोर फेगडे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन रविवारी (ता.4) रोजी सत्कार केला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हा संपर्कप्रमुख पारसचंद साकला व सुभाष पाईकराव या दिव्यांगाचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व दिव्यांग दिना विषयी माहिती दत्ता वाकडे यांनी दिली. सामाजिक भान ठेवून पाटील बंधूंनी कंपनीत काम करणाऱ्या दिव्यांग कामगाराची दखल घेतली. रोजगार तर दिलाच पण अपंग दिनानिमित्त त्यांचा सत्कार करून मनाचा मोठेपणा दाखवला. आज समाजात पाटील बंधू सारख्यांची नितांत गरज आहे. जे दिव्यांगाला मुख्य प्रवाहात अनुपाहत आहेत.
या कार्यक्रमास उपस्थित कंपनीचे मालक योगेश पाटील व गोपाल पाटील तसेच पारसचंद साकला, दत्ता वाकडे, किशोर फेगडे, सुभाष पाईकराव, राहुल पाटील, प्रशांत ठाकरे, वैभव पाटील, शुभम परदेशी, नंदू गडाख, सौरभ पाटील यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *