प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्यमान भारत) योजनेतील लाभार्थ्यांचे ई कार्ड काढण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय तिसगाव ता. जि. औरंगाबाद येथे शनिवारी (ता.3) व रविवारी (ता.4) रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत (शिबीर) कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाचा लाभ घ्यावा. असे अहवान ग्रामपंचायत तिसगावचे ग्रामविकास आधिकारी अशोक गायकवाड, सरपंच शकुंतला कसुरे, उपसरपंच नागेश कुठारे तसेच सर्वच ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.
