
वाळूजमहानगर, (ता.2) :- रंगलालजी बाहेती अंध मुलींचे निवासी प्रशिक्षण केंद्र येथील प्रशिक्षण केंद्रात अंधमुलींना त्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या वस्तूंचे किट व ब्लॅंकेटचे वाटप विघ्नहर्ता प्रतिष्ठान सिडको महानगर-2 साउथ सिटी यांच्या वतीने रविवारी रोजी करण्यात आले.
यावेळी अंधमुलींना भेट वस्तू देण्यात आल्या व त्यांच्या समूहात सहपरिवार गोड जेवणही करण्यात आले. येणाऱ्या काळात विघ्नहर्ता प्रतिष्ठान तर्फे असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपण राबवणार आहोत प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. गरजूवंतांना विघ्नहर्ता प्रतिष्ठान तर्फे मदत करण्यात येईल अपंग व दिव्यांग माणसांसाठी आम्ही सतत कार्य करत राहणार आहोत, गोरगरिबांची सण, उत्सव आनंदात झाले पाहिजे. यासाठीही विघ्नहर्ता प्रतिष्ठान काम करेल. कार्यक्रमाला आयोजक विघ्नहर्ता प्रतिष्ठान सिडको वाळूज महानगर 2 व साउथ सिटी व प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
