वाळूजमहानगर, (ता.30) – पश्चिम विधानसभा मतदार संघातील आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवस मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्ताने आमदार संजय शिरसाट यांच्यावर मंगळवार 29 रोजी जिल्ह्यातील तसेच राज्यभरातून आलेल्या त्यांच्या हजारो चाहत्यांनी अक्षरशः शुभेच्छा वर्षाव केला.शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून त्यांच्या संपर्क कार्यालयात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत संपर्क कार्यालयात आमदार शिरसाट यांच्या चाहत्यांचे शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी होती.

यावेळी आमदार संजय शिरसाट यांनी सहकुटुंब सर्व कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांचा शुभेच्छा स्वीकार केला. तत्पूर्वी पहाटे पाच वाजता सातारा खंडोबा मंदिरात आरती केली, त्यानंतर बजाज नगर येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात आमदार शिरसाट यांनी सहकुटुंब श्री ची आरती केली तसेच सुरू असलेल्या योगा प्राणायाम शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. आप्पावाडी परिसरातील तुळजाभवानी मंदिरात जाऊन आमदार शिरसाट यांनी दर्शन घेतले.तुळजाभवानी मंदिरात आई महाराज यांनी त्यांना आशीर्वाद दिला.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, भरतसिंग राजपूत, रमेश पवार, विजया शिरसाट, नगरसेवक सिंद्धात शिरसाट, हर्षदा शिरसाट, तुषार शिरसाट, शिल्पाराणी वाडकर, उपशहरप्रमुख राजू राजपूत, रमेश बाहुले, सतीश निकम, अनिल मुळे, संजीव अवस्थी, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय औताड़े, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, राजू वरकड, व्यंकटेश काकडे अफसर खान, अप्पासाहेब हिवाळे, सरपंच सुनील काळे, उपसरपंच ज्योतीताई साळे,शहर प्रमुख श्रीकांत साळे, पंचायत समिती सदस्य राजेश साळे, सामाजिक कार्यकर्ते राम पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य राणीताई पाटोळे, माधुरी सोमासे, विभागप्रमुख राजन सोमासे, व्यंकटेश काकडे, प्रदीप मोतींगे, शशिकांत ढमढेरे, सचिन बोर्डे, कुशल पाटणी, संतोष नरोडे, रोहित राऊत, अशोक लगड, हनुमान भोंडवे, गणेश वाघ, विभागप्रमुख रणजित ढेपे, शिवाजी हिवाळे, मनोज सोनवणे, शाखाप्रमुख ईश्वर पारखे, गणेश शर्मा, युवासेना तालुकाप्रमुख राजेश कसुरे, प्रदीप गुणवानी, भागचंद मोठे, युवासेना अर्जुन पेरकर, गणेश तेलोरे, शेखर जाधव, अरविंद कामतीकर, परमेश्वर घावट, पराग कुंडलवाल, सचिन वाहुळकर, अमोल पाटे, आकाश राऊत, अरुण हिवाळे, नरेंद्र जबिंदा, पप्पू व्यास, अनिल बिरारे, कडू कीर्तिकर, भीमराव हत्तीहंबीरे, सागर वाडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अशोक येळीकर, वाहेद शेख, विभागप्रमुख गणेश जाधव, संदीप आरके, भुरासिंग राजपूत, विनोद बनकर, अमर सभाडींडे, गुड्डू बासनिवाल, सागर नीलकंठ,विजय टाक, अमित टाक, सूरज शिंदे, सुरज चव्हाण, कृष्णा बनकर, सविता कुलकर्णी आदी मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
चौकट
आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी दूरध्वनीद्वारे आमदार शिरसाट यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे आशा मंगलमय शुभेच्छा दिल्या.
