February 5, 2026

वाळूजमहानगरवाळूज येथील बडवे कंपनीत टाकण्यात आलेल्या दरोड्यातील गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळावर श्वानाने घेतलेला माग, तांत्रिक पुरावे, गोपणीय माहीतीच्या सहाय्याने व कसोशिने प्रयत्न करुन आरोपीचा शोध घेवून आठ आरोपी निष्पन्न करुन त्यापैकी पाच जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला एक गावठी कट्टा/ पिस्टल व एक राऊन्ड असा ऐवज पोलिसांनी सोमवारी (ता.3) रोजी जप्त केला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज येथील बडवे आँटोकॉम्स प्रा. लि. या कंपनीत सिक्युरिटी गार्ड लक्ष्मण तुकाराम आडे (वय 36)वर्षे, रा. सिद्धीविनायक गणेश मंदीराजवळ, बजाजनगर यांच्यासह जगन्नाथ बाबुराव वारुळे व साहेबराव दादा पारधे असे तिघे ड्युटी करतहोते. सोमवारी (ता.26) रोजी मध्यरात्री 1.45 वाजेचे सुमारास कॉपर शॉप 2 च्या भितोच्या बाजूने मोकळ्या जागेतून चोरीच्या उद्देशाने अंदाजे सात-आठ अनोळखी ईसम त्यांच्या अंगावर आले. त्यांच्या तोंडाला रूमाल बांधलेले होते. त्याचे हातात लाकडी फळी, कत्ती, पिस्टल, दो-या होत्या. त्यांनी जीवे ठार मारण्याचा धाक दाखवुन सिक्युरिटी गार्डचे हातपाय दोरीने बांधुन तोंडाला चिगट पट्टी लावली. तसेच त्यांच्या खिशातून मोबाईल घेवून ते फोडले. दरम्यान आरडा ओरडीमुळे इतर कंपनीतील सहकारी येत असल्याचे पाहुन आरोपी हे चोरी न करता पळुन गेले. या प्रकरणी लक्ष्मण आडे यांच्या फिर्यादवरुन वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळावर श्वानाने घेतलेला माग, तांत्रिक पुरावे गोपणीय माहीतीच्या सहाय्याने व कसोशिने प्रयत्न करुन आरोपीचा शोध घेवून आठ आरोपी निष्पन्न करुन त्यापैकी आरोपी अमोल काशीराम खरात (वय 25) रा. राजुरा ता. गंगापुर जि. औरंगाबाद (ह.मु. हरीओमनगर, कमळापुर), सचिन रतन साठे (वय 32) वर्ष रा. अजुवानगर, वाळुज, ता. गंगापुर जि. औरंगाबाद, विनोद शंकर गुढेकर (वय 28) रा. मु.पो. बोकुड जळगाव, ता. गंगापूर जि. औरंगाबाद (ह.मु. मक्तार सय्यद यांचे घरात भाड्याने लाईननगर, वाळुज), सतिश जनार्धन हिवराळे (वय 31) रा. मु.पो. इसारवाडी, ता. पैठण व राहुल रमेश दाभाडे (वय 25) रा. बजाज कंपनी पार्किंग गेट जवळ अजवानगर वाळुज यांना अटक करुन अवघ्या दोन दिवसात गुन्हा उघडकीस आणुन गुन्ह्यात वापरलेला एक गावठी कट्टा/ पिस्टल व एक राऊन्ड जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस उपआयुक्त उज्वला वनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस अमलदार संदीप धनेधर, आनंद वाहुळ, विजय पिंपळे, श्रीकांत सपकाळ, गणेश लक्कस, किशोर सांबळे, सचिन राजपुत यांनी केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *